TransLiteral
भाद्रपदकृष्ण पक्षांतील षष्ठीचे दिवशीं मंगळवार, व्यतीपात, रोहिणी, ह्या सर्वांचा योग आला असतां त्या षष्ठीला कपिलाषष्ठी असे म्हणतात. जर ह्या षष्ठीचे दिवशी हस्तनक्षत्रींचा सूर्य असेल तर अतिमहाफल मिळते. ह्या कपिलाषष्ठीचा योग सूर्यपर्व आहे याकरितां दिवसाचाच घ्यावा, रात्री घेऊं नये असे शास्त्रवचन आहे. ह्या दिवशी होम, दान वगैरे केले असतां कोटी कोटी पुण्य मिळते. परंतु ह्या दिवशी कधीही श्राद्ध करू नये.