TransLiteral
कार्तिक महिन्यांत तुलसी विवाह करतात, तिचे लग्न भगवान कृष्णाशी लावून देतात, आणि ते अक्षय्य असते. तुलसी विवाह केल्यास अथवा पाणी घातल्यास अकाल मृत्यु येत नाही. म्हणून मुलीचे लग्न लागत असतांना आई तुळसीला पाणी घालते. त्यामध्ये अशी भावना असते की, ज्याप्रमाणे श्रीकृष्ण आणि तुलसीचा विवाह जन्मजन्मांतरीचा आहे तसाच आपल्या मुलीचा संसार रुक्मिणी ( तुलस ही रुक्मिणीचेच रूप आहे ) प्रमाणेच व्हावा.