TransLiteral
लक्ष्मीच्या आठ अवतारांपैकी एक अवतार म्हणजेच गजलक्ष्नी.
गजलक्ष्नीचे व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष दशमीला करतांत.
घरात सुबत्ता नांदावी आणि आपल्या गाई, म्हशी वगैरे पशुधनाला आरोग्य लाभावे म्हणून गजलक्ष्मी व्रत करतात.
या दिवशी षोडशोपचारे पूजा करतात. उपवास करून, पूजा झाल्यावर उपवास सोडतात, शक्यतो पूजा सायंकाळी करतात.
कांहीजण ब्राह्मण बोलावतात, तेव्हां ब्राह्मणाला भोजन देऊन, दक्षिणा द्यावी.