TransLiteral
हिंदू पुराणात पापांचे दोन प्रकार सांगितलेले आहेत.
१) कायिक पापे - हिंसा करणे, परस्त्रीची लालसा बालगणे, स्वतःच्या नसलेल्या गोष्टींची इच्छा करणे.
२) वाचिक पापे - इतरांचे वाईट चिंतणे, परद्रव्य लुबाडणे किंवा त्याचीइच्छा बाळगणे.
खरेतर जे काम वाईट ते पापच. वाईट इच्छा सुद्धा पापच.
पापाचे क्षालन करण्यासाठी 'पंचशीलकर्म' करावे, असे शास्त्र सांगते.
पापाची मनोमन कबुली द्यावी, प्रायश्चित्त घ्यावे, स्वतःला शासन करून घ्यावे, पश्चात्ताप करावा, शक्यतो पापाचे परिमार्जन करावे.
इष्टदेवतेच्या मंत्राचा १०८ जप करावा, पण त्या आधी शुचिर्भूत व्हावे.
गुरूजवळ, मोठ्या वडील माणसांजवळ, अथवा घरातील देव्हारा असेल तिथे देवासमोर बसून एकाग्र चित्ताने पापाची कबुली द्यावी. पुन्हा असे घडणार नाही अशी शपथ घ्यावी.
Transliteral-Foundations
पापापासुन भगवंत पण सुटला नाही. जोपर्यंत त्याचे प्रायश्चित्त होत नाही, मुक्ती नाही. त्याला काहीही पर्याय नाही. गुरु, ग्रंथ किंवा अन्य कोणात्याही मार्गाने त्यापासुन सुटका नाही. स्वतः प्रायश्चित्त करुन होत नाही ते नियतीने ठरवावे लागते.
गुरुने सांगीतले आणि प्रायश्चित्त केले तर पाप मिटले असे समजून मनाची शांति होत असेल तर ठीक आहे.