दोन नेळवी = एक कोळवे
दोन कोळवी = एक चिपटे
दोन चिपटी = एक मापटे
दोन मापटी = एक शेर
दोन शेर = एक अडशिरी
दोन अडशिर्या = एक पायली
सोळा पायल्या = एक मण
वीस मण = एक खंडी
एक मण म्हणजे साधारण 40 किलो असते. लाकूड मोजताना हे एकक अजूनही वापरतात. निरनिराळ्या प्रांतांत निरनिराळीं खंडी आढळतें मुंबईकडे सामान्यत ; २० मणांची खंडी असुन विशिष्ट पदार्थ्यांना ८ मणांची असते . पुण्यास २० मणांची खंडी असते .
८०० किलो म्हणजे मग 1 खंडी.
Ref:
खंडी
संजय माळी