TransLiteral
यज्ञक्रिया करणार्यांना ’ऋत्विज’ म्हणतात.
हे चार गटात विभागलेले असतात.
१ - होता -
या गटात होता व त्याचे साहाय्यक म्हणून मैत्रावरुण, अच्छावाक व ग्रावस्तुत् मिळून चार ऋत्विज.
२ - उद्गाता -
या गटात उद्गाता व त्याचे साहाय्यक प्रस्तोता, प्रतिहर्ता, सुब्रह्मण्य मिळून चार ऋत्विज.
३ - अर्ध्वयू -
या गटात अर्ध्वयू व त्याचे साहाय्यक प्रतिप्रस्थाता, नेष्टा व उन्नेता मिळून चार ऋत्विज.
४ - ब्रह्मा -
या गटात ब्रह्मा व त्याचे साहाय्यक ब्राह्मणाच्छंसी, आग्नीथ्र व पोता मिळून चार ऋत्विज मिळून सोळा व सदस्य हा सतरावा ऋत्विज सर्व यज्ञावर देखरेख ठेवीत असतो.